Saif Ali Khan SaamTv
Video

Saif Ali Khan : सैफ सिंहासारखा हॉस्पिटलमध्ये चालत आला; रक्तबंबाळ 'हिरो'ला बघून डॉक्टरही हैराण

Saif Ali Khan Health Recovery : सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली आहे. त्यासंदर्भात आज डॉक्टरांनी एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

Saam Tv

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर आता आज लीलावती येथे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तब्बेतीबद्दल माहिती दिली आहे. यावेळी डॉक्टरांनी सैफ रुग्णालयात दाखल झाला तेव्हाचा थरारक अनुभव सांगितला. सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढला आहे. त्याची छायाचित्रेही समोर आली आहेत.

यावेळी बोलताना डॉक्टर म्हणाले की, सैफ जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा तो रक्ताने माखलेला होता. त्याच्यासोबत मुलगा तैमूर होता. एवढं लागलेलं असतानाही सैफ सिंहासारखा चालत होता. एखाद्या चित्रपटासारखं ते दृश्य होतं. सैफ आता पूर्णपणे बरा आहे. त्याला आयसीयूमधून स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. सैफला चालण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि तो नशीबवान आहे त्याने स्ट्रेचरही मागितले नाही.

दरम्यान, डॉक्टरांनी सैफला एक आठवडा विश्रांती घेण्यास सांगितले आहे. डॉक्टरांनी असेही सांगितले की अभिनेत्याला आठवडाभर बेड विश्रांती घेणे आवश्यक आहे आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याला 2 ते 3 दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT