Saif Ali Khan Attack Update CCTV Saam Tv
Video

Saif Ali Khan Attack: मध्यरात्री १.३७ ची वेळ, पाठीवर काळ्या रंगाची बॅग, संशयित हालचाली; सैफच्या हल्लेखोराचा आणखी एक व्हिडीओ समोर

Saif Ali Khan Attack Update CCTV Video: सैफ अली खानवर हल्ला कणाऱ्याचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यांवर चढताना दिसत आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. हा हल्लेखोर सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीमध्ये जात असताना सीसीटव्हीमध्ये कैद झाला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सैफ अली खानवर हल्ला कणाऱ्याचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, यामध्ये एका व्यक्तीने तोंड लपवण्यासाठी तोंडाला गुलाबी रंगाचा गमछा बांधलेला आणि पाठीवर काळ्या रंगाची बॅग अडकवलेला दिसत आहे. हा आरोपी पायऱ्यांवरून लपून चालताना दिसत आहे. य आधी देखील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये तो पायऱ्यांवरून उतरताना दिसला होता.

सैफ अली खानवर हल्लेखोराने चाकू हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे. चाकूचा एक मोठा तुकडा सैफच्या पाठीमध्ये घुसला होता. हा चाकूचा तुकडा मानेजवळ मणक्यामध्ये घुसला होता. न्युरोलॉजिस्ट डॉ. डांगे यांनी शस्त्रक्रिया करून सैफच्या पाठीतील चाकूचा तुकडा बाहेर काढला आहे.

सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. त्याला काल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. हा हल्ला किती भयानक होता हे या चाकूच्या तुकड्यावरून समजतंय. सैफ अली खानला १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. २ ते ३ सेंटीमीटरचा हा चाकूचा तुकडा आहे. या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT