Mahim News SaamTv
Video

Sada Sarvankar News : सदा सरवणकर वाद प्रकरण; महिलांनी थेट गाठलं पोलीस स्टेशन, पाहा Video

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकर यांना लाडक्या बहीणींनी धारेवर धरलं. त्यानंतर या महिलांनी थेट माहीम पोलिस ठाणे गाठून सरवणकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेत असताना काही ठिकाणी मतदारांकडून आमदारांना जाब विचारला जात आहे. माहीमचे आमदार सदा सरवणकर यांना देखील प्रचारावेळी महिलांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. माहीम मच्छीमार कॉलनीतील महिलांनी फिश फूड स्टॉल बंद केल्याच्या कारणावरून सरवणकर यांना चांगलच धारेवर धरलेलं बघायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आता या महिलांनी थेट माहीम पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. माहीममध्ये फिश फूड प्लाझामध्ये असलेले स्टॉल गेल्या ५ महिन्यांपासून बंद करण्यात आलेले आहेत. ते परत कधी सुरू करण्यासाठी या महिला संतप्त झाल्या आहे. या वेळी महिलांनी सदा सरवणकर यांना जाब विचारत धारेवर धरल्याचा व्हिडिओ देखील केला. यात सरवणकर महिलांना उत्तर न देताच या ठिकाणाहून काढता पाय घेताना दिसत आहेत. यानंतर सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांनी आमच्यावरच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप केले असल्याचा दावा या महिलांनी केला आहे. त्यांनी आमच्यावरील आरोप सिद्ध करावे आणि मग बोलावं असं या महिलांचं म्हणण आहे. जर आमच्या कुटुंबातील कोणालाही काही बरं वाईट झालं, तर त्याचे पूर्णपणे जबाबदार सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि स्थानिक शाखाप्रमुख मिलिंद तांडेल असतील अशी तक्रार देण्यासाठी या महिलांनी थेट माहीम पोलीस स्टेशन गाठलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

Karjat Fort : कर्जतजवळच्या 'या' किल्ल्यावर अनुभवा ट्रेकिंगचा थरार, दगडात कोरलेला जिना पाहून व्हाल थक्क

मागच्या वेळी रसद पुरवली, पण यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार नाही; मराठा समन्वयकांचा मोठा निर्णय

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये; उदय सामंत यांचे आवाहन

Maharashtra News Live Update: विलास घुले खून प्रकरण खासदार पुत्राला अटक करा या मागणीसाठी टायर पेटवून आंदोलकांकडून निषेध

SCROLL FOR NEXT