Hingoli Balapur News SaamTv
Video

Saam Impact : सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, हिंगोलीच्या 'त्या' रुग्णालयात तात्काळ बेड्स मागवले | VIDEO

Hingoli Balapur News : हिंगोलीतल्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Saam Tv

हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची बातमी साम टीव्हीने दाखवताच आरोग्य विभागाचे अधिकारी जागे झाले असल्याचं बघायला मिळालं आहे. याठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी हरज झाले असून मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेत रुग्णांसाठी तत्काळ बेड मागवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सचिव यांना स्वत: फोन करून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना जमिनीवरच झोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॉट उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया झालेल्या ४३ महिलांना जमिनीवर झोपविण्यात आल्याचा हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयात घडला. कडाक्याची थंडी असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या महिलांना रुग्णालयात जमिनीवर झोपायला दिल्याची बातमी साम टीव्हीने आज दाखवली होती. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आरोग्यविभागच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली बघायला मिळत आहे. हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांनी बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत या रुग्णांसाठी तत्काळ बेड देखील मागवण्यात आले आहेत. दरम्यान, या चौकशीचा अहवाल प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT