Iran war impact on crude oil prices 
Video

Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

Iran war impact on crude oil prices : होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे, इराण युद्ध आणि जागतिक इंधन दरवाढीच्या दबावामुळे अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरील धोरणात मोठा बदल केल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ भूमिकेला जागतिक ऊर्जा संकटाने कसा धक्का दिला, ते जाणून घ्या.

Snehil Shivaji

Iran war impact on crude oil prices : रशियाचा धाक आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे अमेरिकेनं टॅरिफला टाटा केलयं...ट्रम्प यांनी त्यांचा 'टॅरिफ बॉम्ब' स्वतःच कसा निकामी केलाय. ट्रम्प यांना इराणनं कसं गुडघ्यावर आणलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

उठसूठ मनात येईल तसा मनमानी टॅरिफ लावून जगाला छळणाऱ्या ट्रम्पला इराणनं अशरक्ष गुडघ्यावर आणलंय. 14 दिवस बलाढ्य अमेरिकेच्या हल्ल्यांनी जखमी होऊनही अजिबात विचलित न होता इराणनं जगावर लादलेला टॅरिफ बॉम्ब फोडून अमेरिकेला अद्दल घडवल्याचं आता बोललं जातंय. कारण अमेरिकेनं आता जागतिक इंधन दरवाढीच्या आणिबाणीनंतर टॅरिफ लादलेल्या देशांसाठी मोठा निर्णय घेतलाय.

ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब फुटला

रशियाकडून तेल खरेदी करण्यास मान्यता

जगातील सर्व देशांना अमेरिकेची सवलत

आंतराष्ट्रीय दबावापुढे झुकले ट्रम्प

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलं इंधन

रशियाची नाकेबंदी करण्यासाठी ट्रम्प यांनी जगभरात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अवाढव्य टॅरिफ लावला. आता रशियानं अमेरिकेचा बदला घेत युद्धात इराणच्या पाठीशी उभं असल्याचं जाहिर केल्यानंतर युद्धात रशिया उतरला तर हे युद्ध आणखीन भडकेल आणि म्हणूनच रशियाला शांत करण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या धोरणात बदल केल्याची चर्चा आहे. या युद्धात अमेरिकेन बाजी मारल्याच्या कितीही टिमक्या ट्रम्प मारत असले तरी इराणनं होर्मुझमध्ये नाकेबंदी करत जागतिक दबाव तयार करुन अमेरिकेवर बाजी मारली असंच म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT