cancer News SAAM TV
Video

Russia Develops Cancer Vaccine : कॅन्सररूग्णांसाठी मोठी खूशखबर; रशियाच्या संशोधनानं कॅन्सरवर मात

Cancer Vaccine : जगभरात कॅन्सरमुळे लाखो लोकांचा जीव जातोय... मात्र आता याच जीवघेण्या कॅन्सरवर लस शोधण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय.... मात्र रशियाच्या लसीची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि ही लस भारतात कधी मिळणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

कॅन्सरचं नाव घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत असताना रशियाने कॅन्सरग्रस्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी दिलीय. दुर्धर असलेल्या कॅन्सरवर मात करण्यासाठी रशियाने लस बनवून मोठी क्रांती केल्याचा दावा करण्यात आलाय. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडीओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी ही माहिती दिलीय... तर ही लस 2025 च्या सुरुवातीलाच लाँच केली जाणार असल्याचं समोर आलंय...या लसीची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात...

रशियाच्या रेडीओलॉजिकल मेडिकल रिसर्च सेंटरने लस तयार केल्याचा दावा

लसीमुळे कॅन्सरच्या गाठीची वाढ आणि वाढीचा वेग रोखता येणार

कॅन्सरच्या गाठीची निर्मिती रोखण्यासाठी लसीचा वापर नाही

रशियातील नागरिकांना मोफत लस मिळणार

2025 च्या सुरुवातीलाच लस लाँच केली जाणार

लसीचं नाव अद्याप गूप्त ठेवण्यात आलं

जगभरात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढतीय...त्यातच भारतात 2024 मध्ये तब्बल 20 लाख कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत. तर 6 लाख 11 हजार लोकांचा कॅन्सरमुळे बळी गेलाय.. त्यामुळे या जीवघेण्या आजारावर लस शोधण्यासाठी पाश्चिमात्य देश संशोधन करत आहेत...मात्र रशियाने शोधलेली लस किती प्रभावी ठरणार आणि ती भारतात कधी मिळणार? याकडे कॅन्सरग्रस्तांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT