sunetra pawar  Saam tv
Video

Sunetra Pawar : त्या ३५ आमदारांचाच सुनेत्रा पवारांना पाठिंबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचंय?

Sunetra Pawar latest news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या पार्श्वभूमीवर ३५ आमदारांच्या पाठिंब्याबाबत रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Rohit Pawar reaction to Sunetra Pawar becoming NCP president : सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा होणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेय. यावरून रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा कुणीही करू देत. पण ३५ आमदारांनी आणि ३२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करावी असे पाठिंब्याचे पत्र दिले होते, त्या सर्व आमदारांचे मनापासून अभिनंदन करतो, असे रोहित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, याबाबत २६ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. यावर रोहित पवार यांनी निशणा साधलाय.

रोहित पवार म्हणाले की, "काल राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) बैठक झाली, त्यामध्ये २६ तारखेला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याचे मला टीव्हीच्या माध्यमातून समजले. ज्या ३५ आमदारांनी सुनेत्रा काकींचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रस्तावित केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, "जवळपास ३२ ते ३३ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कागदावर लिहून दिले आहे की सुनेत्रा काकीच अध्यक्ष असाव्यात. घोषणा कोणीही केली असली तरी, तिथले आमदार आणि पदाधिकारी सुनेत्रा काकींच्या सोबत आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यांना आमचा बाहेरून पाठिंबा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: नॅचरल ग्लो हवा? महागड्या ट्रीटमेंटऐवजी करून पाहा हा घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये ऊस वाहतूक ठप्प! ५ हजार रुपये दराच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर

... तर आणखी एक मोठा अणुबॉम्ब फोडणार; मनोज जरांगेंच्या दाव्याने महायुतीत पुन्हा खळबळ

India vs New Zealand: तिलक-नीतीश आणि नमनच्या तिकडीनं फिरवला डाव; न्युझीलंडच्या तोंडचा घास हिरावला,टीम इंडियाची २-०ने आघाडी

Colon Cancer : पाइल्स समजून दुर्लक्ष करू नका! 'ही' ६ लक्षणे कॅन्सरची असू शकतात; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

SCROLL FOR NEXT