Ajit Pawar plane crash saam tv
Video

Ajit Pawar Death : पायलटचा वापर करुन अजितदादांचा घातपात? रोहित पवार नेमकं काय म्हणाले....

Rohit Pawar PC on Ajit Pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत फ्यूल टँक, ब्लॅक बॉक्स आणि सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar crash probe, Rohit Pawar allegation : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा 'घातपाता'चा संशय व्यक्त केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही नवीन पुरावे आणि तांत्रिक मुद्दे मांडत आपला संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील नवीन माहिती समोर आल्यानंतर हा अपघात नसून घातपात असावा, या दिशेने लोकांचा आणि तज्ज्ञांचा कल वाढू लागला आहे. २७ तारखेला घडलेल्या घडामोडी, कुणीतरी भेटायला येणे आणि आलेले फोन कॉल्स यावरून संशय बळावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी विमानातील फ्यूल टँकवर शंका व्यक्त केली. विमानामध्ये इंधनाचे अतिरिक्त कॅन (Fuel Can) ठेवले होते का? अशी शंका त्यांनी पुन्हा केली. त्यांनी आधीच वर्तवलेले भाकीत खरे ठरत असल्याचे सांगताना ते म्हणाले की, आता केंद्र सरकारच्या एजन्सीकडून "ब्लॅक बॉक्समध्ये अडचण असू शकते" किंवा "त्याचा काही भाग जळाला आहे" असे स्पष्टीकरण दिले जात आहे.

व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानाचे मेंटेनन्स आणि इतर तांत्रिक बाबींचे दाखले देत त्यांनी सुरक्षेच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक सखोल व्हावा आणि तज्ज्ञांची मदत घेऊन ब्लॅक बॉक्स विदेशात तपासासाठी पाठवला जाणार असल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT