Eknath Shinde IT Notices to Shinde ministers saam tv
Video

शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; आमदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ | VIDEO

income tax notices sent to all Eknath shinde ministers : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या पक्षातील नेते आणि सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा धाडण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Nandkumar Joshi

  • एकनाथ शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सकडून नोटिसा

  • रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

  • शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्याचाही समावेश असल्याची माहिती

  • राज्याचे राजकारण ढवळून निघाले

शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत ठाण मांडून बसले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा आल्या आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यात सर्व काही आलबेल नसल्याचीही चर्चा आहे. महायुतीत असलेले छुपे मतभेद हे यामागचं कारण असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंबाबत धक्कादायक आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. रोहित पवार यांनी शिंदेंच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिंदेंच्या कुटुंबातील एका व्यक्तीलाही नोटीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

SCROLL FOR NEXT