Dnyaneshwar Chavan and Family Saam
Video

गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब अचानक बेपत्ता, ४० तासांनी सापडलं, समोर आल्यानंतर त्यांनी घटनाक्रमच सांगितला | VIDEO

Dnyaneshwar Chavan and Family: गणपतीनिमित्त गावी जाताना शिक्षक व कुटुंब ४० तास बेपत्ता झाले होते. मोबाईल बंद झाल्यामुळे नातेवाईक व समाजात खळबळ उडाली होती.

Bhagyashree Kamble

  • गणपतीनिमित्त गावी जाताना शिक्षक व कुटुंब ४० तास बेपत्ता झाले होते.

  • मोबाईल बंद झाल्यामुळे नातेवाईक व समाजात खळबळ उडाली होती.

  • अखेर गोंदवले महाराज मठ येथे संपूर्ण कुटुंब सुखरुप असल्याचं स्पष्ट झालं.

  • शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वतः व्हिडिओ संदेशातून माहिती दिली.

गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर नातेवाईक आणि समाजात खळबळ उडाली होती. हिंगोलीचे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे पत्नी आणि दोन मुलांसह कारने गावी जात होते. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे मोबाईल तब्बल ४० तास बंद असल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. अखेर २८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांचा ठावठिकाणा लागला असून, संपू्र्ण कुटुंब सुखरूप असल्याची माहिती आहे.

ज्ञानेश्वर चव्हाण यांचं कुटुंब गोंदवले महाराज मठ, तालुका माण येथे मुक्कामी थांबलं होतं. याबाबत स्वतः ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्हिडिओ जारी करून माहिती दिली. त्यांनी गेल्या ४० तासांत काय घडलं याबाबतही खुलासा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

Maharashtra News Live Update: वारणा आणि कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या,नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

महागड्या शॅम्पूची गरज नाही, लांब आणि घनदाट केसांसाठी सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT