ATM NEWS  SAAM tV
Video

ATM News: ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलन्स चेक केला तरी अकाउंट बॅलन्स कमी होणार, VIDEO

RBI Approves NPCI Proposal to Hike: आरबीआयकडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावास मंजूरी दिली असून आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे.

Omkar Sonawane

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे आता अधिक महाग होणार आहे. 1 मेपासून हा बदल लागू होणार आहे. ठराविक मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास, आता प्रति व्यवहार 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच, बॅलन्स तपासण्यासाठी आकारले जाणारे शुल्क 7 रुपयांवरून वाढवून 9 रुपये करण्यात आले आहे.

एटीएम शुल्क वाढवल्यामुळे, एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या एटीएमचे देखभाल व संचालन खर्च पूर्वीपेक्षा लक्षणीय वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही मागणी आरबीआयसमोर मांडली होती, आणि आता आरबीआयने त्याला हिरवा कंदील दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT