ratan tata Saam tv
Video

Mumbai 26/11 Attacks:...तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बनं उडवून द्या; रतन टाटा यांनी थेटच सांगितलं होतं, VIDEO

Mumbai 26/11 Attacks: ताज हॉटेलवरील दहशवादी हल्ल्याचा तो किस्सा रतन टाटा यांनी सांगितला. या हल्ल्याचा किस्सा रतन टाटा यांनी सांगितला.

Saam Tv

मुंबई : ताज हॉटेलवर 26/11 च्या हल्ला झाला. त्यावेळी रतन टाटांनी स्वत: एक किस्सा सांगितला होता. काय आहे तो पाहूयात...

उद्योगपती टाटा, प्राणीमित्र टाटा, हळवे टाटा सर्वांनाच माहितीयत. मात्र वेळ आली तर हेच टाटा किती धैर्यवान आणि अग्रेसिव्ह होतात, याचा अनुभव मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी आला. ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी वेठीस धरलं त्यावेळी गरज पडली तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बनं उडवून द्या. मात्र दहशतवाद्यांना जिवंत सोडू देऊ नका, असं सांगण्याची हिंमत टाटांनी दाखवली.

26/11ला दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला लक्ष्य केलं होतं. ताजच्या कर्मचा-यांना रतन टाटांनी फोन केला, मात्र त्याठिकाणी कुणीही फोन न उचलल्यामुळे स्वत: गाडी काढून ते ताजला पोहोचले. मात्र सुरक्षा रक्षकानं त्यांना आत जाण्यास मनाई केली. या सगळ्या अडचणीच्या काळात रतन टाटा आपल्या कर्मचा-यांच्या कायम संपर्कात होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते ताज हॉटेल व्यवस्थापनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. ताजच्या भव्यतेसारखेच विशाल हृदयाचे रतन टाटा भारतीयांच्या कायम स्मरणात राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT