Bor Tiger Reserve Saam Tv
Video

Tiger: हरणांच्या कळपातून ऐटीत चालला वाघ, बोर व्याघ्र प्रकल्पाची अद्भुत क्षण, पाहा VIDEO

Bor Tiger Reserve: बोर व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहेत. हरणांच्या कळपातून ऐटीत चालणाऱ्या वाघाचा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध वन्यजीवसंपदेचे दर्शन घडविणारा एक अप्रतिम व्हिडिओ सध्या वन्यजीव प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. अमरावतीमधील वन्यजीव छायाचित्रकार अमेय ठाकरे यांनी सफारीदरम्यान हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये हरणांच्या कळपामधून एक वाघ शांतपणे आणि ऐटीत चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या उपस्थितीतही हरणांचा कळप काही अंतर राखून सावधपणे उभा असल्याचे दृश्य निसर्गातील संतुलन आणि वन्यजीवनातील नैसर्गिक हालचालींचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख मिळालेला बोर व्याघ्र प्रकल्प आज जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कमी क्षेत्रफळ असूनही येथे वन्यजीवांची मोठी विविधता आढळून येते. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यासारख्या सस्तन प्राण्यांसह अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी फुलपाखरांच्या विविध प्रजाती येथे पाहायला मिळतात. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि संवर्धन केंद्रांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT