Ranjitsing Mohite Patil SaamTv
Video

BJP News : भाजपला मोठा धक्का; रणजितसिंग मोहिते पाटलांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Assembly Elections Update : विधानसभा निवडणुकीत भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. रणजितसिंग मोहिते पाटलांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Saam Tv

भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रणजितसिंग मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर ते आज रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आजच्या बैठकी नंतर हा प्रवेश होणार आहे.

रणजितसिंग मोहिते पाटील हे माढामधून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. आज त्यांनी भाजपकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर आज रात्री ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी आजच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते स्वत: उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत हा भाजपला मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे रणजितसिंग मोहिते पाटील यांनी पाठवेलेला राजीनामा भाजप स्वीकारेल का हे बघणं महत्वाचं ठरेल. तर दुसरीकडे त्यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार यांची ताकद वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT