Ramraje Nimbalkar News SaamTv
Video

VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

Ajit Pawar Rashtrawadi Group : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाकडून अजित पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. शरद पवार हे अजितदादांना आता आणखीन एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Saam Tv

शरद पवार हे अजित पवारांना आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. फलटणमधून रामराजे निंबाळकर यांनी नुकतीच भर सभेत अजित पवार यांना फोन करून आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली. मात्र तेच रामराजे निंबाळकर आता शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांना आणखीन एक धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रामराजे निंबाळकर यांची जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून आज रात्री मेळावा घेणार आहेत. त्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपला निर्णय घेतील असं बोललं जात आहे. आता ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊन तुतारी हाती घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आपल्या सभेत रामराजे निंबाळकर यांनी फलटण मतदारसंघातून आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिल्याचं घोषित केलं होतं. यावेळी त्यांनी अजित पवार यांना फोन करून ही उमेदवारी घोषित केली होती. मात्र आता रामराजे निंबाळकर यांची शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर रामराजे देखील तुतारी हाती घेतील का? याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस धावली; ५१ लाखांचा निधी सुपूर्द

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT