डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याला सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. जामीन रद्द केल्यानंतर आता ५ ऑक्टोबरआधीच कोर्टासमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली आहे. २८ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं म्हात्रेचा जामीन रद्द केला होता.
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला सुरुवातीला अटक झाली होती. म्हात्रेने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात त्याला जामीनही मंजूर झाला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हा जामीन रद्द केला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पीडित डॉक्टरच्या वडिलांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले होते. कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.