Ramdas Athawale SaamTv
Video

Ramdas Athwale : रामदास आठवलेंनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट; भेटीनंतर उपस्थित केला 'हा' महत्वाचा प्रश्न, पाहा Video

Satosh Deshmukh Death Case : मंत्री रामदास आठवले यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

Saam Tv

संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबद्दल मी सांगणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. सोमवारी रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. सर्व विरोधीपक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतानाच बीडमधील नागरिकांकडून देखील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यानंतर आज मंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे. केवळ प्रॉपर्टी जप्त करून चालणार नाही. आरोपी पकडायला एवढा वेळ लागतो ही चांगली बाब नाही. वीस दिवस उलटूनही नातेवाईकांचं अजूनही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी बोलणार आहे, असं आठवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे कारनामे एकूण चक्रावाल, ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

IPL 2026: रोहित-रिकेल्टनचं तुफान आणि बुमराह-शार्दूलची जादू; या ५ कारणांमुळे मुंबईचा दणदणीत विजय

अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग? धक्कादायक माहिती समोर; शिक्षण क्षेत्रात खळबळ

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT