Beed trader Ram Fatale's suicide sparks outrage as viral call recordings expose moneylender's abuse. Saam Tv
Video

Beed News: धक्कादायक! सावकाराच्या छळाला कंटाळून बीडमधील कापड व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल|VIDEO

Shocking Viral Audio: बीड शहरातील व्यापारी राम फटाले यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या दोन धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग समोर आल्या आहेत.

Omkar Sonawane

बीड: शहरातील पेठ भागातील कापड व्यवसायिक राम फटाले यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना 10 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि मयत राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हा फटाले यांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करत आहे. तू माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना घेऊन ये तसेच माझी मुद्दल मला दे कधी देतोस ते सांग? तू नाही आलास तर मला तुझ्या घरी पोरं घेऊन यावं लागेल अशा प्रकारे धमकावत आहे.

तर दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये 2000 रूपये टाकले वरचे चारशे रुपये तुझा बाप टाकणार आहे का ? अशा प्रकारची भाषा सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव वापरत असल्याचं या कॉल रेकॉर्डिंग मधून समोर आलं आहे.

तर तुला पैसे देणं होत नसेल तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड अशा प्रकारची भाषा वापरल्याचा देखील फिर्यादीमध्ये उल्लेख आहे.

या आणि अशाच प्रकारच्या सावकाराकडून होत असलेल्या जाचाला कंटाळूनच राम फटालेंनी आत्महत्या केल्याचं आता स्पष्ट होत आहे. यामुळे बीड शहरातील हे प्रकरण अतिशय गंभीर बनलं असून सावकारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहान Live कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक रडू लागली, नेमकं काय घडलं?

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

SCROLL FOR NEXT