rajnath singh  saam tv
Video

Rajnath Singh: पीओके एक दिवस भारतातच येणार; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं|VIDEO

Rajnath Singh Warns Pakistan: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला असून आता फक्त चर्चा पीओके आणि दहशतवादावर होईल असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

पहलगाम दहशतवाद हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. यानंतर भारताकडून पाकिस्तानला सातत्याने इशारे दिले जात आहे. आज पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, पीओकेमधील लोक देखील आपलेच आहेत, त्यांना दिशाभूल केले जात आहे. पीओके आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की, एक दिवस पीओके स्वतःच भारतात सामील होण्यास तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजनाथ सिंह म्हणाले, आता पाकिस्तानसोबत चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवर होईल आम्ही मोदीजींच्या एक भारत आणि भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत आम्हाला विश्वास आहे की एक दिवस नक्कीच पीओकेतले लोक भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT