Rajot Fort Rada Video  Saam TV
Video

Rajkot Fort VIDEO: आधी केस ओढले, नंतर चापट्या मारल्या; राजकोट किल्ल्यावरच महिला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Rane vs Thackeray Rajkot Fort Rada : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली.

Satish Daud

राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी देखील एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की शिवसेना ठाकरे गट आणि राणे समर्थक महिला एकमेकांना मारहाण करताना दिसून येत आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

सध्या पोलिसांकडून हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या राड्यात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांसह काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. महाराजांचा पुतळा कोसळला. या सर्व प्रकरणाची पाहणी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता.

त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणेही तिथेच उपस्थित होते. जेव्हा अदित्य ठाकरे आणि मविआचे नेते किल्ल्यावर पोहचले. तेव्हा राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून वाद सुरू झाला आणि नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

SCROLL FOR NEXT