Rajendra Shingne Saam tv
Video

Rajendra Shingne : अजित पवार यांना पुन्हा धक्का; राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात, पाहा VIDEO

Rajendra Shingne joins sharad Pawar group : राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.

ऐन विधानसभा निवडणुकीत शिंगणे यांनी तुतारी फुंकल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांची पुतणी गायत्री शिंगणे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार गटाने शिंगणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Maharashtra News Live Update: पाटबंधारे विभागातील 314 कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT