A pigeon seen flying with a gold chain around its neck in Nagaur, Rajasthan. Saam Tv
Video

कबुतराचा दुकानात ज्वेलर्सवर डल्ला, सोन्याची साखळी घेऊन उडालं|VIDEO

Pigeon Steals Gold Chain From Jewellery Shop: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली आहे. एका ज्वेलरी दुकानातून चक्क कबुतराने सोन्याची साखळी उचलून नेली.

Omkar Sonawane

सध्या सोने चांदीचे भाव हे गगनाला भिडले आहे. दिवसेंदिवस सोने चांदीचे भाव कमी जास्त होत आहे. तसेच सोने चोरीच्या घटना ही वाढताना दिसत आहे. अशातच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून नुकतीच एक अतिशय धक्कादायक आणि मजेशीर घटना समोर आली आहे. सहसा चोरीच्या बातम्यांमध्ये माणसांची चर्चा होते, पण यावेळी मात्र चोरी करणारा चक्क कबूतर निघाला आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, नागौरच्या डेगाणा भागात एका ज्वेलरी दुकानाच्या वरच्या मजल्यावर सोन्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी एक कारागीर सोन्याची साखळी तयार करत होता. याच वेळी अचानक एक कबूतर तेथे आले आणि सर्वांनाच चकित करणारी कृती केली. त्या कबुतराने सोन्याची साखळी आपल्या चोचीत पकडली आणि क्षणात उडून गेले. मात्र ही गोष्ट इथेच थांबली नाही.

या खोडकर कबुतराने ती साखळी थेट आपल्या गळ्यात घातली आणि संपूर्ण परिसरात उडत फिरू लागले. यामुळे परिसरातील लोकांना एकच आश्चर्याचा धक्का बसला. कबुतराच्या गळ्यातील सोन्याची साखळी पाहून अनेकांनी त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT