Raj Thackeray reacts sharply after viral video of Assembly clash; slams government for moral collapse in Maharashtra politics. Saam Tv
Video

Raj Thackeray: कोणाच्या हातात दिलात महाराष्ट्र?' विधानसभेतील राड्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया | VIDEO

Raj Thackeray Slams Government: विधानभवनातील कार्यकर्त्यांमधील हाणामारीनंतर राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? असा थेट सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय नैतिकतेवर सवाल उपस्थित केला आहे.

Omkar Sonawane

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधीमंडळाच्या आवारात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध केला असून यावर आता मनसेपक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्ली घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

SCROLL FOR NEXT