Raj Thackeray Saam Tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Bombay Dhaba: ठाणे- भिवंडी सीमेवरील खारेगाव खाडीच्या पुलाजवळ असलेल्या बॉम्बे ढाब्याचा फलक मनसे कार्यकर्त्यांनी फाडला. राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बॉम्बे ढाब्यावर धाव घेत मालकाला फलक बदलण्याचा देखील इशारा दिला.

Priya More

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारासाठी भेटी देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील शाखांना भेटी देत आहेत. कल्याण येथून शाखा भेटींचा कार्यक्रम संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना राज ठाकरेंची नजर ठाणे- भिवंडी सीमेवरील खारेगाव खाडीच्या पुलाजवळ असलेला बॉम्बे ढाब्यावर गेली. या ढाब्यावर अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याची बाब राज ठाकरे यांनी आपल्यासोबत असलेले ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात आणून दिली.

त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा प्रमुख परेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह बॉम्बे ढाबा येथे धाव घेत ढाबा व्यवस्थापकाला येथील नाव तत्काळ बदलण्याचे, येथील विद्युत साईन बोर्ड बंद करण्याचे आदेश दिले. या ढाब्यचे नाव मुंबई करण्यात यावे असे ते म्हणाले. यावेळी संतप्त झालेल्या मनसैनिकांनी बॉम्बे ढाब्याचे नामफलक फाडून आपला संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT