MNS Avinash Jadhav News Saam Tv
Video

Avinash Jadhav : मोठी बातमी! अविनाश जाधव यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, दंडही ठोठावला

MNS Avinash Jadhav News :महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाआधीच राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. NOTA पर्यायासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Alisha Khedekar

राज्यात २९ महानगरपालिकांच्या मतदानासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र निवडणुकांमध्ये बरेच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं चित्र २०२६च्या महापालिका निवडणुकी दरम्यान पाहायला मिळालं. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून आतापर्यत भाजपाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी याचिका दाखल केली होती, मात्र ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आला असेल तरीही मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीची विधानं केली. रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले. मात्र, यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही. त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे सुरुवातीला न्यायमूर्तींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT