raj thackeray uddhav thackeray news 
Video

Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, कौटुंबिक कार्यक्रमात साधला संवाद

raj thackeray uddhav thackeray news : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. एका लग्नसोहळ्यात दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. राजकीय पटलावर विरोधात असणारे कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आले.

Namdeo Kumbhar

raj thackeray uddhav thackeray news : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावी, ही अनेक शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण राजकीय पटलावर आम्ही कधीच एकत्र येणार नाही, असे विधानसभेवेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्याशिवाय राज ठाकरेंनीही नकार दिला होता. मागील २० वर्षांपासून हे दोन्ही बंधू आपला वेगळा ठसा निर्माण करत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर अनेकांना राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. राजकीय पटलावर या दोन्ही नेत्यांनी आपली वाट वेगळी असल्याचे सांगितले होतं. पण एका लग्नाच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे एकत्र आले. दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. एका लग्नसोहळ्यात त्यांनी गप्पा मारल्या, वेळ घालवला. काय चर्चा झाली, हे समोर आले नाहीत. या भेटीनंतर महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण तयार होणार का? याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं थाटामाटात लग्न पार पडले. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब आले होते. याच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसाची इच्छा आहे, पण राजकीय नाही तर कौटुंबिक कारणामुळे दोन ठाकरे एकत्र आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT