Raj Thackarey News SaamTv
Video

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Raj Thackarey Criticized Sharad Pawar : शरद पवारांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवडी मतदारसंघातील सभेतून केला आहे.

Saam Tv

महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेला आहे. या हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम प्रामुख्याने शरद पवारांनी केलं आहे. त्यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. डाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर चालू झाले आहे. राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. शिवडी मतदारसंघातील लालबाग येथील प्रचार सभेत आज ते बोलत होते.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो, एनसीपी असो हे सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, हे मी माझ्या अनेक सभांमधून सांगितलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये जसे राजकारण चालते तसे महाराष्ट्राचे होऊ नये. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सगळं विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी, का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणासाठी, असा हल्ला यावेळी बोलताना राज ठाकरेंनी चढवला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राज ठाकरेंनी नाव न घेता निशाणा साधला. शिवसेना भाजपला मतदारांनी मतदान केलं. मात्र शिवसेना फुटली, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच विरोधकांच्यासोबत स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊन आघाडी करत सत्ता स्थापन केली. हा मतदारांच्या मताचा अपमान त्यांनी केला, असा टोला उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी लगावला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT