Raigad Amba River Saam TV
Video

Raigad : रायगडला पावसानं झोडपलं, अंबा नदीवरील पुलाचा कठडा गेला वाहून |VIDEO

Heavy Rain Triggers Bridge Damage on Amba River : अंबा नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचा कठडा कोसळला आहे. त्यामुळे नागोठणे-वरवटणे मार्गावर वाहतुकीचा धोका निर्माण झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, नागोठणे परिसरात नदीवरील एका महत्त्वाच्या पुलाला मोठा फटका बसला आहे. अंबा नदीवरील या पुलाचा एक कठडा जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.ही घटना नागोठणे ते वरवटणे मार्गावर घडली असून, या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीचा प्रवाह अजूनही प्रचंड असून, स्थानिक प्रशासनाने या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT