Rahul Gandhi addressing media during the INDIA Bloc protest against the Election Commission in Delhi. Saam Tv
Video

Rahul Gandhi: पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा|VIDEO

Rahul Gandhi says Picture Abhi Baaki Hai: राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतचोरीविरोधात इशारा दिला. काँग्रेसच्या वेब पोर्टल मोहिमेला २४ तासांत १५ लाखांहून अधिक समर्थन मिळाले असून, इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये मोर्चा काढला.

Omkar Sonawane

  • राहुल गांधींनी मतचोरीविरोधातील मोहिमेला जनआंदोलनाचा दर्जा मिळाल्याचा दावा केला.

  • काँग्रेसच्या वेब पोर्टलवरून १५ लाखांहून अधिक समर्थन प्रमाणपत्रे डाउनलोड झालीत.

  • १० लाखांहून अधिक लोकांनी मिस कॉल करून समर्थन दर्शवलं.

  • इंडिया आघाडीने ३०० खासदारांसह निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला.

देशातील मतचोरीविरोधातील मोहीम आता जनआंदोलन बनल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधींना केलाय. वेब पोर्टल लाँच झाल्यापासून २४ तासांत १५ लाखांहून अधिक समर्थन प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यात आलीत तर 10 लाखांहून अधिक मिस कॉल्स आल्याची माहिती ट्विट करत राहुल गांधींनी दिलीय. काँग्रेसने लोकांसाठी एक वेब पोर्टल सुरू केलंय, या पोर्टलवर नोंदणी करुन मतचोरीविरोधात निवडणूक आयोगाकडून उत्तरे मागू शकतात. डिजिटल मतदार यादीच्या मागणीला पाठिंबा देखील देऊ शकतात. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये व्होट चोरीचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी एक पीपीटी सादर करत अनेक पुरावे दाखवले होते. तसेच काल दिल्लीमध्ये 300 खासदारांसह इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला. राहुल गांधीनी यावर अधिक भाष्य करत म्हणाले की पिक्चर अभी बाकी है!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT