Rahul Gandhi Martial Arts Saam Tv
Video

Rahul Gandhi : मार्शल आर्टच्या रिंगणात राहुल गांधी, मुलांना दिले सुरक्षेचे धडे; पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi Martial Arts: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानच्या प्रवासात दररोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी राहुल गांधी चिमुकल्यांना मार्शल आर्टचे धडे द्यायचे.

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

राजकारणाच्या आखाड्यात राजकीय डाव टाकणाऱ्या राहुल गांधींचा मार्शल आर्टच्या रिंगणातील व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये राहुल गांधी मार्शल आर्टचे डाव टाकून प्रतिस्पर्ध्याला चितपट करताना दिसून येत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानच्या प्रवासात दररोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी राहुल गांधी चिमुकल्यांना मार्शल आर्टचे धडे द्यायचे. जिऊ जित्सू, आयकिडो या मार्शल आर्ट प्रकारातून स्वतःची सुरक्षा कशी करायची हे राहुल गांधींनी लहान मुलांना दाखवून दिलं.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने राहुल गांधींनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केलाय. देशभरातून राहुल गांधींच्या फिटनेस आणि मार्शल आर्टचं कौतूक केलं जातंय. आता राहुल गांधी मार्शल आर्टच्या रिंगणाप्रमाणेच राजकीय आखाड्यातही सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड देणार का? हेच पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT