राहुल गांधींकडून पहिल्यांदाच खासगी आयुष्याचा उलगडा; 'त्या' खास रेस्टॉरंटमध्ये प्रेयसीला नेल्याचा सांगितला किस्सा Saam Tv
Video

खासगी आयुष्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर; राहुल गांधींनी सांगितला प्रेयसीसोबतच्या 'त्या' खास डेटचा अनुभव

सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी खासगी आयुष्यातील एक आठवण सांगितली.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi On Belonging: A Journey of Love : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. केंब्रिज येथे शिक्षण घेत असताना आपल्या प्रेयसीला एका अत्यंत खास ठिकाणी घेऊन गेल्याची आठवण त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितली.

केंब्रिजमध्ये असताना आपण आपल्या प्रेयसीला 'व्हार्सिटी' (Varsity) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हे तेच रेस्टॉरंट होते जिथे त्यांचे आई-वडील (राजीव गांधी आणि सोनिया गांधी) यांची पहिली भेट झाली होती.

या रेस्टॉरंटचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, याची आपल्या प्रेयसीला कोणतीही कल्पना नव्हती. आपल्या आई-वडिलांची जिथे पहिली भेट झाली होती, ती जागा प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा असल्याने आपण तिला तिथे घेऊन गेलो होतो, असा हृदयस्पर्शी किस्सा राहुल गांधी यांनी या सोहळ्यात उलगडला. या आठवणीमुळे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का; विश्वासू शिलेदाराचा शिवसेनेत प्रवेश, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला

Tuesday Horoscope : कामात डोकं शांत ठेवा! 4 राशींना धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगर 3.0 आधी उद्धव ठाकरेंची खेळी; शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश,शिंदे गटाला जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT