राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या खासदार आणि कार्यकर्त्यांवर विनापरवाना आंदोलन केल्याचा आरोप केला जातोय. आठ तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह सुमारे २६० जणांना ताब्यात घेतले. आता बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या भोजनानंतर राहुल गांधी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. राहुल गांधी खासदारांसोबत बसमधून थेट जंतरमंतरच्या दिशेने निघाले आहेत. दिल्लीच्या जंतरमंतरवर ते आता मुख्य निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणार आहेत. राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला काल निवडणूक आयुक्तांना भेटायचे होते, पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही. तिथे आंदोलन करता येणार नाही असे सांगून दिल्ली पोलिसांनी आम्हाला अडवले. आज आम्ही पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसणार आहोत. आमच्या दृष्टीने ज्ञानेश कुमार हे भारताचे कायदेशीर निवडणूक आयुक्त नाहीत. त्यांनी देशाची लोकशाही नष्ट केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.