Rahul Gandhi PC SaamTv
Video

Rahul Gandhi Press Conference : अदानींनी देश हायजॅक केलाय, PM मोदी त्यांच्या दबावाखाली आहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized Adani And PM Modi : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

Saam Tv

अदानी तुरुंगाबाहेर का आहेत हा प्रश्न आहे. अदानी यांनी गुन्हा केल्याचे अमेरिकन एजन्सीने सांगितलं आहे. पण पंतप्रधान काहीच करत नाहीत. ते काहीही करू शकत नाहीत, कारण पंतप्रधान मोदी त्यांच्या दबावाखाली आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात झालेल्या सुनावणीत गौतम अदानींसह 8 जणांवर अब्जावधी रुपयांची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता शेअर मार्केटमध्ये घसरण झाली आहे. याच सगळ्या मुद्यांवरून आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अदानीजी 2 हजार कोटींचा घोटाळा करत आहेत आणि बाहेर फिरत आहेत, कारण पंतप्रधान मोदी त्यांना संरक्षण देत आहेत. गौतम अदानी यांनी अमेरिकेत गुन्हे केले आहेत, मात्र भारतात त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. अदानीच्या संरक्षक सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. विरोधी पक्षनेता म्हणून मी हा मुद्दा मांडत आहे. अदानी भाजपला पूर्ण पाठिंबा देतात. आमची मागणी JPC स्थापन करण्याची आहे. भारताचे पंतप्रधान अदानीजींच्या मागे उभे आहेत. एखादी व्यक्ती छोटासा गुन्हा करूनही तुरुंगात जाते. अदानींना मात्र काही होत नाही. अदानींना काही होणार नाही, त्यांना अटक होणार नाही, कारण मोदी त्यांच्यासोबत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाई करावी. अमेरिकेच्या एफबीआयने तपास केला आहे. अदानी भ्रष्टाचार करत असल्याचे मी आधीच सांगत आहे. चौकशी झाली पाहिजे, असं मी यापूर्वी दोन-तीन वेळा पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. अदानीला अटक झाल्याशिवाय गोष्टी सुटणार नाहीत. अदानीजी भाजपला निधी देतात. नरेंद्र मोदी अदानींना अटक करू शकत नाहीत. मोदींनी असे केले तर ते (मोदी) ही जातील. अदानींनी देश हायजॅक केला आहे, असा घणाघात यावेळई राहुल गांधी यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT