Pune Dam Water Storage Saam TV
Video

Pune Dam Storage : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा आकडेवारी

Pune Dam Water Storage : पुणे शहरातील धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

Satish Daud

पुणे शहरातील धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा जवळपास 90 टक्क्यांवर पोहचलाय. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं असून वर्षभराची चिंता मिटली आहे.

पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात आतापर्यंत 81.43 टक्के पाणीसाठा जमा झालाय. तर पानशेत धरणात 91.76 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्याचबरोबर वरसगाव धरण 86.75 टक्के आणि टेमघर धरणातील पाण्याची टक्केवारी 88.48 इतकी आहे.

हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT