Pune Rape case CCTV VIDEO saam tv
Video

Pune Crime : ५ वाजून ३८ मिनिटं, पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार; स्वारगेट डेपोमधील CCTV

Pune Crime News : पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांची ही घटना आहे. या घटनेचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Nandkumar Joshi

पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. दत्तात्रेय गाडे असं आरोपीचं नाव आहे. २५ फेब्रुवारीच्या पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी ही घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी डेपोच्या परिसरात अनेक लोक उभे होते. काही बस ये-जा करत होत्या. या घटनेचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

स्वारगेट एसटी डेपोमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. डेपोमध्ये एका बाजूला अंधारात पांढऱ्या रंगाची शिवशाही बस उभी होती. याच बसमध्ये नराधमाने तरुणीवर बलात्कार केला. आरोपी या सीसीटीव्हीमध्ये दिसून येत नाही.

एसटी डेपोत पहाटे अंधार होता. याच अंधाराचा फायदा घेत आरोपीनं या तरुणीला आपल्या बोलण्यात गुंतवलं. तिला शिवशाही बसमध्ये नेलं. तिथं तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही असतानाही ही घटना कुणाच्याच लक्षात आली नाही का?

एसटी डेपोमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहे. डेपोमधील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आहे. ज्या ठिकाणी केबिन आहे, तिथं कुणी नव्हतं का? सीसीटीव्हीमधील चित्रण पाहण्यासाठी कुणी अधिकारी, कर्मचारी नव्हतं का? एसटी बसचा दरवाजा लॉक नव्हता का? आरोपी शिवशाही बसमध्ये कसा चढला? लॉक होतं तर, आरोपीनं तरुणीला दरवाजा उघडून कसा दिला? लॉक नव्हतं तर ड्रायव्हरनं का केला नाही? चालकानं चावी जमा केली होती का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळं एसटी डेपोमधील सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT