Swargate case trupti desai detained saam tv
Video

Pune Swargate Case : स्वारगेट डेपोबाहेर राडा, आंदोलक तृप्ती देसाईंची धरपकड, VIDEO

Trupti Desai Detained : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोतील तरुणीवरील बलात्कार प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nandkumar Joshi

पुणे

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळं एसटी डेपोच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडं पोलिसांना जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई सुद्धा तिथं पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबतच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळं परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आरोपीला तातडीने अटक करावी. ४८ तास झाले तरी आरोपीला अटक झालेली नाही. पोलीस काय करतात, असा सवालही त्यांनी केला. परिवहन विभागाने तातडीने महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

तृप्ती देसाई आणि त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींना अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गानं जाब विचारतोय त्यांना ताब्यात घेतलं जातं. आरोपीला वेगळा न्याय, लोकशाही मार्गाने भांडताहेत त्यांना वेगळा न्याय, असा संताप त्यांनी व्यक्त केला. मला योगेश कदम यांना जाब विचारायचा होता, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात आंदोलन केलं. स्वारगेट चौकात हे आंदोलन केलं. आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT