pune news  saam tv
Video

Pune News: पुण्यात सकल हिंदू समाज रस्त्यावर, काढला मोर्चा; कारण काय?VIDEO

Sakal Hindu Samaj Road Block in Pune: पुणे शहरात आज सकल हिंदू समाज मोर्चा काढण्यात आला होता, शहरातील काही अनधिकृत बांधकामे हटवावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून येथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेने तात्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली. या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अतिक्रमणांविरोधात व हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलीस चौकीसमोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. विविध हिंदू संघटना, संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसांत आरक्षित जागेचा ताबा घेणार नाही, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. यामुळे जवळपास अडीच ते तीन तास वाहतूक ठप्प झाली.

योगेश टिळेकर म्हणाले, हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही. मात्र, त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमणे आणि त्यातून घडणाऱ्या राष्ट्रविरोधी घटना रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे. या परिसरात महानगरपालिकेचे भाजी मंडईचे आरक्षण आहे. मात्र, ४० वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही व आरक्षित जागा ताब्यात घेत नाही. ही जागा ताब्यात घेऊन नागरिकांसाठी भाजी मंडई उभारली जावी. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, याचे स्पष्टीकरण आम्हाला हवे आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योगेश टिळेकर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपल्याचे जाहीर करत सर्व हिंदू बांधवाना शांततेने घरी जाण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या सहकार्याबद्दल टिळेकर यांनी त्यांचेही आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT