Pune rain video car stuck in flood water  Saam TV
Video

Pune Rain News : पुण्यातील टिळक पूल पाण्याखाली; पुराच्या पाण्यात कार अडकली, थरारक VIDEO

Pune Rain Alert : पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Satish Daud

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी पहाटेपासूनच पुण्यात पावसाने अधिकच जोर धरला. मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पूर्णत: पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

या पुलावर पांढऱ्या रंगाची एक कार अडकून पडली आहे. या कारमध्ये प्रवासी आहे की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT