Pune’s DES-run HA School under fire after students’ photos were made viral for not paying fees. Saam Tv
Video

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Pimpri Chinchwad DES School Shames: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील डीईएसच्या एच.ए. शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो पालकांच्या ग्रुपवर व्हायरल केले. या धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये संताप उसळला असून शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवडमधील डीईएसच्या एच.ए. स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून पालकांच्या ग्रुपवर टाकले गेले.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याची पालकांची तक्रार.

फी वसुलीसाठी सार्वजनिक बदनामी करणं हा अमानवी प्रकार असल्याचा आरोप.

शिक्षण विभागाने चौकशी करून शाळेविरोधात कठोर कारवाईची पालकांची मागणी.

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या एच.ए. स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वार्षिक शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो शाळेच्या प्रशासनाने काढून ते थेट पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वर्चुअल मास्क लावून हे फोटो ग्रुपवर टाकण्यात आले. मात्र इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत फोटो काढल्याने अनेक विद्यार्थी मानसिक धक्क्यात गेले आहेत.

विद्यार्थ्यांचे फोटो अशा प्रकारे पालकांच्या ग्रुपवर व्हायरल केल्याने शाळेच्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पालकांच्या मते, फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांची सार्वजनिक बदनामी करणे हा अमानवी आणि शिक्षणाच्या मुलभूत मूल्यांना तडा देणारा प्रकार आहे.

या घटनेमुळे शिक्षण विभागाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेविरोधात तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी पालकांकडून मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

SCROLL FOR NEXT