Pune Unempolyment News Saam Tv
Video

Pune : जॉबसाठी काय पण! बेरोजगारीचं विदारक वास्तव, मगरपट्यात नोकरीसाठी एक किलोमीटरची रांग; पाहा VIDEO

Pune news : एका आयटी कंपनीने वॉक-इन इंटरव्ह्यू ठेवला होता. मुलाखत देण्यासाठी कंपनीबाहेर रांगा लागल्या. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पुण्यातील मगरपट्टा भागातला असल्याचा दावा केला जात आहे.

Yash Shirke

Pune Unempolyment News : देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्याच्या मगरपट्टा भागातला आहे असा दावा केला जात आहे. तेथील एका नामांकित आयटी कंपनीने वॉक-इन इंटरव्ह्यू ठेवला होता. नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या उद्देशाने तरुणांनी रांगा लावल्या. मुलाखतीसाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. नोकरी मिळेल या आशेने राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही, तर देशभरातून बेरोजगारांनी गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याला ओळखले जाते. पण मागील काही वर्षात पुण्याची 'आयटी शहर' अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. पुणे आणि परिसरात अनेक आयटी कंपन्या आहेत. विविध राज्यातून अनेक तरुण नोकरीसाठी पुण्याला येत असतात. अशात जर एखाद्या कंपनीने ओपन प्लेसमेंट ठेवले असेल तर त्या ठिकाणी या तरुणांची गर्दी होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT