Pune Accident news Today Saam TV News
Video

PMP Bus Accident: मागच्या चाकात पाय अडकला! गंभीर जखमी महिलेली सुरु असलेल्यी मृत्यू झुंज अपयशी

Pune Bus Accident News: पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये पाय अडकला. यामुळे ही गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

Saam TV News

पुणे : पीएमपी बसच्या चाकामध्ये पाय अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ही दुर्दैवी घटना घडली. पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये पाय अडकला. यामुळे ही गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. काशीबाई खुंरगळे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगळे यांची पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यावरुन पीएमपी बसचालक दिलीपराव वामनराव लहाने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी दुपारी पीएमपी बसमध्ये पाठीमागील दरवाजातून ही महिला चढत होती. परंतु त्यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar: वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार किती फायदेशीर? जाणून घ्या किती कॅलरी बर्न होतात?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; दोन बड्या IAS अधिकऱ्यांची तडकाफडकी बदली

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

Dhurandhar 3: 'लियारीची स्टोरी अजून संपली नाही; 'धुरंधर ३'ची तयारी सुरु? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये सोमवारी १२ तास पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT