Pune Porsche Car Accident  Saam Tv
Video

VIDEO: ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, विशाल अग्रवालसह ६ जणांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Porsche Car Accident : कल्याणी नगर अपघातात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, ससूनचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली होती.

Priya More

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवा, आई शिवानी अग्रवालसह इतर ६ जणांचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. या चारही आरोपींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता या सर्वांना येरवडा कारागृहामध्येच राहावे लागणार आहे.

कल्याणी नगर अपघातात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, ससूनचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यांनी जामीनासाठी कोर्टामध्ये अर्ज केला होता. पण कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

ससून रुग्णालयातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सबळ पुरावे सरकारी पक्षाकडून देण्यात आले होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. यानंतर आज पुणे सत्र न्यायालयाने विशाल अगरवाल इतर सर्व ६ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT