MPSC Student protest Saam Tv
Video

MPSC Student protest : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची, पाहा VIDEO

MPSC Student protest In Pune : पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. वारंवार एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय. या विद्यार्थ्यांचं हे पहिलंच आंदोलन नाहीये. यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळेस आंदोलन केल्याचं समोर आलंय. आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आंदोलनादरम्यान आता एमपीएससी करणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसतंय. शास्त्री रोडवर सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झालीय.पोलिसांना विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. पोलिसांसोबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हुज्जत घातल्याचं समोर आलंय. ही गर्दी वाढतच चालली आहे, त्यामुळे गर्दी नियंत्रणात आणणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana For Weight Loss: नाश्त्याला केळी खाल्ल्याने खरच वजन कमी होते का?

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

SCROLL FOR NEXT