Pune Protest SaamTv
Video

Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यात आंदोलन; कारवाईची मागणी | Video

Pune Protest : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्या विरोधात आता पुण्यात मराठा सेवकांनी आंदोलन सुरू केलं आहे.

Saam Tv

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता पुण्यात मराठा सेवकांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झालेले बघायला मिळाले. राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत, असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर आता टीका होत आहे. मराठी सिनेसृष्टी बरोबरच राजकीय वर्तुळातून देखील त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याच अनुषंगाने आज पुण्यात मराठा सेवकांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आंदोलन केलं आहे. यावेळी घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. तसंच सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या अपमान केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT