Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar : अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसायचं टाळलं ? अजित पवार स्पष्टच बोलले.. | VIDEO

Ajit Pawar - Sharad Pawar News : पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले बघायला मिळाले. मात्र यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या शेजारी बसायचं टाळलेलं बघायला मिळालं.

Saam Tv

पुण्यात आज एका कार्यक्रमात पवार काका पुतण्या पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले बघायला मिळाले आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरी कार्यक्रमात एका मंचावर दिसले तरी यावेळी अजित पवार यांनी मात्र काका शरद पवार यांच्या शेजारी न बसता आपली आसन व्यवस्था बदलून घेतलेली बघायला मिळाली आहे. यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसत आहे. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्यात अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाच्यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यभागी बसले. त्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. बाबासाहेबांना शरद पवार साहेबांसोबत बोलायचं होतं, मी केव्हाही बोलू शकतो. बाबासाहेब पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, त्यांना साहेबांशी चर्चा करायची होती, त्यामुळे ते मध्ये बसले होते. मी तिथं असलो तरी मला बोलता येत होतं. माझा आवाज मोठा आहे. दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला देखील ऐकायला जातो, असं म्हणत अजित पवार यांनी चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील काका पुतण्या एकाच व्यासपिठावरती एकत्र आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT