Warje explosion news 
Video

Pune News : वारजेत गॅस सिलेंडर स्फोट, होरपळून दोघांचा मृत्यू

Warje explosion news : वारजे माळवाडीतील गोकुळनगर येथे मध्यरात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू. पोलीस व अग्निशमन विभाग घटनास्थळी. तपास सुरू.

Namdeo Kumbhar

Pune Fire News : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील गोकुळ नगर येथे मध्यरात्री ३ वाजता एका घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये घडली, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वारजे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन व्यक्ती गंभीररीत्या भाजल्या गेल्या होत्या. या दोघांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वारजे पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, स्फोटामागील कारण आणि अन्य बाबींची चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे सावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT