PUNE MUNICIPAL CORPORATION TO IMPLEMENT NEW ENTRY RULES AFTER BOMB THREAT saam tv
Video

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेत प्रवेशासाठी नवी नियमावली लागू

Pune Municipal Corporation Entry Rules: महापौरांच्या कार्यालयाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, पुणे महानगरपालिका अभ्यागतांच्या प्रवेशाबाबतचे नवीन धोरण तयार करत आहे. या प्रस्तावामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Jadhav

पुणे महानगरपालिकेत प्रवेशासाठी नवी नियमावली लागू करण्याची तयारी सुरू आहे. बॉम्बच्या धमकीनंतर सुरक्षा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या नियमावलीला ठाकरे सेनेने जोरदार विरोध केला आहे. नव्या नियमांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे. भाजपच्या लोकांनाही हे नवे नियम लागू असतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या महापौर कार्यालयाला ई-मेलद्वारे बॉम्ब स्फोटाची धमकी मिळाल्यानंतर महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिकेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतलाय. पुढील दहा दिवसांत त्याचा मसुदा समितीपुढे सादर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT