pune kopa mall threat news saam tv
Video

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune Kopa Mall Threat : पुण्याच्या मुंढवा भागातील कोपा मॉल उडवून देण्याची धमकी देण्यात आली. याबाबतचा मेल आल्यानंतर पोलिसांची एकच धावाधाव झाली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Akshay Badve

पुण्यातील कोपा मॉल स्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पुण्याच्या मुंढवा भागात हा मॉल आहे. मॉल व्यवस्थापनाच्या आयडीवर हा धमकीचा मेल आला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा सगळा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजून २१ मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आला. या प्रकरणात ४५ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याच्या मुंढवा परिसरात कोपा मॉल आहे. सोमवारी सकाळी ७.२१ मिनिटांनी मॉलच्या व्यवस्थापनाच्या इमेल आयडीवर एक मेल येऊन धडकला. मॉलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. याबाबत व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी मॉलमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी सर्व परिस्थिती नियंत्रणात होती. कोणीतरी खोडसाळपणा म्हणून हा धमकीचा मेल केल्याचं आढळून आलं. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT