Pune Rain Saam TV
Video

Pune Rain : पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला|VIDEO

Pune Rain : खडकवासला प्रकल्प क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. शहरातील रस्ते जलमय झाले असून, नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धड्यांच्या क्षेत्रात दोन दिवसापासून चांगला पाऊस होतोय. त्यामुळे सद्यस्थिती खडकवासाच्या प्रकल्पात ५.२० टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी या दरम्यान धरणात ३.९३ टीएमसी इतका पाणीसाठा होता.

संध्याकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने पुणे शहराला झोडपून काढले. मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड, बावधन, औंध, बोपोडी, पाषाण या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी सफाइची कामं झाली नसल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलं. रस्ते जलमय झाल्याने वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक वाहनचालक पाण्यात अडकले तर काही वाहनं बंद पडली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार दुष्काळ दौरा, पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

Maharashtra weather : बळीराजाची चिंता वाढली! राज्यातून मान्सूनची 'एक्झिट; मराठवाडा अन् विदर्भात पावसाची भयंकर तूट

Pradeep Purnekar : ठाण्यात शिंदे शासन आहे का? पूर्णेकर प्रकरणानंतर संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यातून संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT