Notorious gangster Shahrukh Shaikh, alias Atti, was shot dead by police during a joint operation in Mohol, Solapur. He was wanted in multiple criminal cases under MCOCA. Saam TV News
Video

Pune News : पुण्यातील गुंड शाहरूखचा सोलापुरात इन्काउंटर| VIDEO

gangster Shahrukh Shaikh Encounter at Solapur : पुण्यातील सराईत गुंड शाहरूख शेख उर्फ अट्टी सोलापुरातील मोहोळ येथे पोलिस एन्काउंटरमध्ये ठार. १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी जागीच ठार.

Namdeo Kumbhar

Pune Gangster Shahrukh Encounter at Solapur : मोहोळ तालुक्यातील लांबोटी (पुणे) येथे शनिवारी रात्री पुणे क्राइम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) ठार झाला. शेखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ पोलिस ठाण्यांत १५ गंभीर गुन्हे दाखल होते. मकोका अंतर्गत कारवाई झालेला शेख फरार होता.

पुणे क्राइम ब्रांचला शेख लांबोटी येथे नातेवाइकांकडे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच शेखने पिस्तूलातून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेख जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT